असाही एक विक्रम; तब्बल 700 किमी लांब आणि 16 सेंकद चमकत होती वीज

आकाशीय वीज अर्थात लाइटनिंग फ्लॅशचा एक नवीन विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये सर्वाधिक वेळ आणि सर्वाधिक लांबीची वीज चमकल्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान खात्याने मागील वर्षी दोन विभागात विजेच्या विक्रमाची नोंद केली आहे. जागतिक हवामान संस्थेच्या तज्ञांनुसार हा विक्रम आधीच्या विक्रमांच्या तुलनेत खूपच मोठा आहे.

दक्षिण ब्राझीलमध्ये मागील वर्षी 31 ऑक्टोंबरला तब्बल 700 किलोमीटर लांबीची वीज चमकली होती. तर अर्जेंटिनामध्ये 4 मार्च 2019 ला 16.73 सेंकद वीज आकाशात चमकत होती. या आधी जून 2007 मध्ये अमेरिकेच्या ओकलाहोमा या शहरात 321 किमी लांब वीज चमकली होती. तर ऑगस्ट 2012 मध्ये दक्षिण फ्रान्समध्ये 7.74 सेंकदांपर्यंत वीज चमकत होती. मात्र आता हे विक्रम मोडले गेले आहेत.

28 जूनला इंटरनॅशनल लाइटनिंग सेफ्टी डे पाळला जातो. त्याच्या आधी हे विक्रम नोंदवण्यात आले आहे. या लाइटनिंग स्ट्राइकला जियोफिजिक यूनियनने रिकॉर्ड केले आहे.

Leave a Comment