धक्कादायक! राज ठाकरेंच्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. राज ठाकरे यांच्या आणखी 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आले असून, यासह एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर चिंतेचे वातावरण आहे.

काही दिवसांपुर्वी राज ठाकरे 3 सुरक्षा रक्षक आणि 2 चालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले होते. सुरक्षा रक्षकांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

याआधी देखील राज्यातील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनजंय मुंडे या नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र हे तिन्ही नेते या आजारातून बरे झाले आहेत. शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन करण्यात आले होते. भवन एका आठवड्यासाठी बंद देखील ठेवण्यात आले होते.

Leave a Comment