चीनला उत्तर देण्यासाठी भारताने एलएसीवर तैनात केले ‘आकाश’ क्षेपणास्त्र

लडाख भागामध्ये सध्या भारत आणि चीनमधील तणाव वाढल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय सैन्याने एलएसीवर आकाश क्षैपणास्त्र तैनात केले आहे. भारतीय सैन्य एलएसीवर चीनी सैन्यांच्या हालचालींना उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. मागील काही दिवसांमध्ये एलएसीवर चीनच्या हालचाली वाढल्या आहेत, त्यामुळे भारतीय सैन्य पुर्णपणे सतर्क झाले असून, चीनला धडा शिकवण्यासाठी तयार आहे.

चीनसोबत सैन्य स्तरावर देखील बैठक पार पडली होती, मात्र त्यातून काहीही निष्कर्ष निघला नाही. चीनच्या हालचाली वाढल्यानंतर भारताने याआधी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर देखील तैनात केले होते. चीनच्या विमानांना देखील एलएसीवर घिरट्या घालताना पाहण्यात आले होते. आता सैन्याने या भागात आकाश एअर डिफेंस सिस्टम तैनात केली आहे. ही सिस्टम चीनच्या कोणत्याही फायटर जेटला क्षणात उद्धवस्त करू शकते.

आकाश क्षेपणास्त्र सिस्टममध्ये अनेक मॉडिफिकेशन्स आणि अपग्रेड करण्यात आले. जेणेकरून डोंगराळ भागात याचा अचूक वापर करता येईल.

Leave a Comment