अरेच्चा! 60 हजारांच्या स्कूटीच्या व्हीआयपी नंबरसाठी लावली तब्बल 18 लाखांची बोली

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात हिमाचल प्रदेशमधील एका खाजगी कंपनीने 60 ते 80 हजार रुपयाच्या स्कूटरसाठी व्हीआयपी नंबर मिळावा म्हणून तब्बल 18 लाख रुपयांची बोली लावली आहे. हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील शाहपूर येथील हा प्रकार असून, खाजगी कंपनी राहुल पॅम प्रायव्हेट लिमिटेडने एक नवीन स्कूटरची शाहपूर येथे कंपनीच्या नावाने नोंदणी केली आहे.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, कंपनीला या स्कूटरसाठी 90-0009 हा नंबर हवा होता. हा व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी कंपनीने सरकारद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाईन बोलीमध्ये भाग घेतला होता. एक आठवडा चाललेल्या या बोलीत कंपनीने व्हीआयपी नंबरसाठी सर्वाधिक तब्बल 18 लाख 22 हजार 500 रुपयांची बोली लावली.

कंपनीने जर 3 दिवसात एसडीएम कार्यालयात ही रक्कम जमा केल्यास कंपनीला स्कूटरसाठी हा व्हीआयपी नंबर मिळेल. यावेळी इतरांनी देखील वेगवेगळ्या नंबरसाठी 10 ते 15 लाखांची बोली लावली.

Leave a Comment