कोरोनावर प्रभावी ठरलेल्या ‘या’ स्वस्त स्टेरॉयड औषधाच्या वापरास केंद्राची परवानगी

देशात दररोज कोरोनाग्रस्तांची आकडेवारी झपाट्याने वाढत चालली आहे. आता सरकारने कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी कमी किंमतीचे स्टेरॉयड औषध डेक्सामेथासोनचा प्रयोग करण्यास मंजूरी दिली आहे. याचा मेथिलप्रेडनिसोलोनचा पर्याय म्हणून उपयोग होईल. डेक्सामेथासोनचा उपयोग मध्यम आणि गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांवर केला जाईल. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये डेक्सामेथासोन प्रभावी औषध ठरले होते. ज्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने याचे उत्पादन वाढविण्यास सांगितले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल कोव्हिड-19 चे संशोधित आवृत्ती जारी केली आहे. मंत्रालयाने यात कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांचा समावेश केला आहे. ही लक्षणे वास आणि चव घेण्याची क्षमता गमावणे ही आहेत. डेक्सामेथासोनचा उपयोग ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या रुग्णांवर करता येईल. डेक्सामेथासोनचा उपयोग सर्वसाधारणपणे संधिवाता सारख्या आजारात केला जातो.

डेक्सामेथासोन मागील 60 वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे व सर्वसाधारणपणे सूज कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2000 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांवर याचा प्रयोग केला होता. यामुळे मृत्यूचा धोका 35 टक्के कमी झाला.

Leave a Comment