कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांच्या मृत्यूची शक्यता –  डब्ल्यूएचओ

जगभरात लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरस बाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पुन्हा एकदा सावध केले आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. डब्ल्यूएचओचे असिस्टंट डायरेक्टर जनरल रनिरी गुएरा यांनी स्पॅनिश फ्लूचा उल्लेख करत म्हटले आहे की, तेव्हा महामारीचा उद्रेक सप्टेंबर-ऑक्टोंबरच्या हिवाळ्यात वाढला होता.

इटलीच्या आरएआय टिव्हीशी बोलताना ते म्हणाले की, जवळपास 100 वर्षांपुर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोट्यावधी लोकांचा मृत्यू झाला होता. स्पॅनिश फ्लू देखील कोव्हिड-19 प्रमाणेच आहे. तेव्हा देखील उन्हाळ्यात रुग्णांची संख्या कमी झाली होती, मात्र त्यानंतर आकडे वाढले.

याआधी यूरोपियन सेंट्रल बँकेचे प्रमुख क्रिस्टिन लगार्डे म्हणाले होते की, जर आपण 1918-19 च्या स्पॅशिन फ्लू पासून काही शिकले असल्यास, निश्चितच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. याआधी देखील काही अभ्यासात उन्हाळ्यात कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होतो, असे आढळून आले होते. मात्र हे प्रमाण एवढे कमी होत नाही संसर्ग थांबेल.

Leave a Comment