अमानवीय! जेसीबीने उचलून स्मशानात घेऊन गेले कोरोनाबाधित व्यक्तीचे शव, अधिकारी निलंबित

भारतात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या आजाराबाबत लोकांच्या मनात प्रचंड भिती आहे. मृत व्यक्तीच्या शरीराला हात लावण्यास देखील लोक घाबरत आहे. आंध्र प्रदेशमधील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 72 वर्षीय व्यक्तीचे शव घरापासून स्मशान भूमीपर्यंत जेसीबी मशिनच्या साहय्याने नेण्यात आले. या घटनेमुळे आता प्रशासनावर जोरदार टीका केली जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशमधील श्रीकुलुम जिल्ह्यातील पसाला गावातील वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नगरपालिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीचे शव अमानवीय पद्धतीने जेसीबीद्वारे स्मशान भूमीपर्यंत पोहचवले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घातलेले आहे व जेसीबीच्या पुढील भागात शव ठेवलेले आहे.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या घटनेत दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. ते म्हणाले की, ही घटना अमानवीय आहे व अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या प्रकरणात कोणती पावले उचलावीत याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दरम्यान, सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, पालिका आयुक्त नागेंद्र कुमार आणि सॅनिटेरी अधिकारी एन राजीव यांना निलंबित केले आहे.

Leave a Comment