अमेरिकेचे मोठे पाऊल, चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देणार नाही व्हिसा

हाँगकाँगच्या मुद्यावरून अमेरिकेने उघडपणे चीनचा विरोध केला आहे. आता अमेरिकेने चीनचा सत्ताधारी कम्यूनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) पदाधिकाऱ्यांना आता व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबाला देखील लागू असेल. हाँगकाँग मुद्यावरून अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. थोडक्यात, आता चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश नसणार आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो म्हणाले की, चीनच्या सध्याच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी हाँगकाँगचे स्वातंत्र्य कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीसीपीच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षा देण्याचे वचन दिले होते. त्याच दिशेने कारवाई केली जात आहे.

पॉम्पियो म्हणाले की, चीनने ब्रिटनसोबत केलेल्या करारात हाँगकाँगच्या व्यापक स्वायत्तेचा सन्मान करण्याचे वचन दिले होते. मात्र आता वारंवार आपल्या कार्याने ते कमी करत आहेत. लोकतंत्र समर्थकांना अटक करण्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव टाकला जात आहे व मानवाधिकारांचे उल्लंघन केले जात आहे.

 

Leave a Comment