बाबो! 5 वर्षांच्या मुलाने चालवली जेसीबी, सेहवागने देखील केले कौतुक - Majha Paper

बाबो! 5 वर्षांच्या मुलाने चालवली जेसीबी, सेहवागने देखील केले कौतुक

भारतात जेसीबी मशीनची लोकप्रियता काही कमी नाही. काही महिन्यांपुर्वी या मशीनबाबत सोशल मीडियावर हॅशटॅग देखील ट्रेंड होत होते. या भारी भरक्कम मशीनचा वापर देखील तशाच अवजड कामांसाठी केला जातो. याला चालवणारी व्यक्ती देखील सर्वसाधारपणे प्रौढ असते. मात्र सध्या सोशल मीडियावर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने शेअर केलेला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या 5 वर्षांचा मुलगा जेसीबी चालवताना दिसत आहे.

सेहवागने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, जेसीबीला खोदकाम करताना पाहून तुम्ही देखील थांबला असाल, गर्दी केली असेल. मात्र आतापर्यंत यापेक्षा सर्वोत्तम काही पाहिले नसेस. टँलेंट+सेल्फ=विश्वास. जर तुम्हाला वाटते की तुम्ही करू शकता अथवा करू शकत नाही, तर तुम्ही योग्य आहात. कोणालाही एवढ्या कमी वयात हे चालवण्यास देणार नाही. मात्र कौतुक करणे देखील थांबवणार नाही.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती या मुलाला काही प्रश्न विचारत आहे. मशीन चालवतो का, असे विचारल्यावर मुलगा हो असे उत्तर देतो. मशीन चालवण्यास सांगितल्यावर त्वरित धावत जाऊन मशीन चालू करतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक जणांनी या व्हिडीओला पाहिले आहे. अनेकांनी या मुलाचे कौतुक केले.

Leave a Comment