१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकमध्ये मृत्यू


नाशिक : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. नाशिक कारागृहात टायगर मेमनचे दोन्ही भाऊ युसूफ मेमन आणि इसाक मेमन शिक्षा भोगत होते. युसूफचा हृदयविकाराच्या झटक्याचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. युसूफचे शव नाशिकच्या कारागृहात असल्याने विच्छेदनासाठी धुळे शासकीय महाविद्यालयात नेण्यात येणार आहे.

युसूफला मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण युसूफला आजारपणामुळे काही काळासाठी जेलबाहेर ठेवण्यात आले होते. युसूफला आजारपणामुळे जामिन मिळाला होता, पण युसूफ या काळात रुग्णालयातच राहिल, अशी अट ठेवण्यात आली होती. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला याआधीच फाशी झाली आहे. तर मुंबई बॉम्बस्फोटाचे मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अद्यापही फरार आहेत.

Leave a Comment