सुशांतच्या मृत्यूनंतर केवळ ‘या’ अभिनेत्रींनी केली विचारपूस, वडिलांनी दिली माहिती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला दोन आठवडे झाले आहे. मात्र अनेकजण त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर, वरूण शर्मा, विवेक ऑबेरॉय, कृति सॅनॉन हे कलाकार उपस्थित होते. आता सुशांतच्या मृत्यूच्या 12 दिवसानंतर त्याच्या वडिलांनी आपले म्हणणे मांडले आहे.

बॉलिवूड तडकाशी बोलताना सुशांतच्या वडिलांनी सांगितले की, सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक स्टार्स आले होते. मात्र कोणीही त्यांच्याजवळ येऊन बोलले नाही. त्यांनी सांगितले की, आम्ही तीन दिवस मुंबईमध्ये होता. मात्र सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता सोडून कोणीही भेटण्यास आले नाही.

इंडस्ट्रीमधील किती लोकांनी भेट घेतली ? या प्रश्नावर ते म्हणाले की, अंत्यसंस्कारावेळी अनेकजण आले होते, मात्र त्यातील केवळ कृति सेनॉनने भेट घेतली. ती आमच्याजवळ बसून बोलत होती. मात्र आम्ही काहीही बोललो नाही. ती जे बोलत होती, ते आम्ही केवळ ऐकत होतो. आले तर सर्व होते, मात्र कोरोनाच्या भितीने सर्व लांब होते. सर्वांनी मास्क लावल्याने आम्ही कोणाला ओळखू शकलो नाही. कृति सेनॉन बाजूला बसल्याने कोणीतरी ती कृति असल्याचे सांगितले तेव्हा आम्हाला समजले. ती होती की दुसरे कोण हे देखील आम्हाला माहित नाही. मात्र एक स्मार्ट मुलगी होती. जी सुशांतबद्दल बोलत होती.

Loading RSS Feed

Leave a Comment