मच्छरांद्वारे नाही पसरत कोरोना, संशोधनात आले समोर

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दररोज कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. मच्छरांमुळे कोरोना पसरतो का ? असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. मात्र आता एका संशोधनात मच्छरांमुळे मनुष्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार होत नसल्याचे समोर आले आहे. इटलीच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील या आधीच स्पष्ट केले आहे की या गोष्टींचे कोणतेही पुरावे नाहीत की हा व्हायरस रक्त पिणाऱ्या किड्यांद्वारे पसरतो.

संशोधन संस्था IZSVe आणि इटलीच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संशोधनात समोर आले की, टायगर मच्छर अथवा दुसऱ्या सर्वसाधारण मच्छरांद्वारे कोरोनाचा प्रसार होत नाही. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अभ्यासानुसार, संसर्ग झालेल्या रक्ताला अन्नाच्या मार्फत मच्छराला हा व्हायरस देण्यात आला होता.

Leave a Comment