राहुल गांधींची टेलिग्रामवर एंट्री, लाँच केले स्वतःचे चॅनेल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःचे टेलिग्राम चॅनेल लाँच केले आहे. राहुल गांधी आता टेलिग्रामच्या माध्यमातून आपल्या समर्थंकाशी जोडले जातील.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, सुत्रांनी सांगितले की खासदार राहुल गांधी यांचे अधिकृत टेलिग्राम चॅनेल लवकरच व्हेरिफाईड केले जाईल. आतापर्यंत या चॅनेलशी 3500 पेक्षा अधिक जण जोडले गेले आहेत. राहुल गांधी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी, थेट संदेश पोहचण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत आहे. आधीपासूनच ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि फेबसुकच्या माध्यमातून सरकार आणि त्यांच्या धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत.

टेलिग्राम चॅनेल संदेश पाठवण्याचे एक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये केवळ अ‍ॅडमिनचा मेसेज पाठवू शकतो. टेलिग्रामचे चॅनेल सार्वजनिक संदेश मोठ्या प्रमाणात लोकापर्यंत पोहचविण्याचे एक माध्यम आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment