क्रुरकर्म्या ओसामाला इम्रान खान यांच्याकडून शहीदाचा दर्जा बहाल

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याची काही नवीन गोष्ट नाही. पाकिस्तान दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याचे देखील वारंवार समोर आले आहे. आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाच्या संसदेतच जगभरातील दहशतवादी घटनांमध्ये हात असलेल्या अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनचा ‘शहीद’ असा उल्लेख केला आहे. एवढेच नाहीतर इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवाद विरोधातील लढ्यात अमेरिकेला साध द्यायला नको होती.

इम्रान खान म्हणाले की, अमेरिकन सैन्याने पाकिस्तानात घुसून लादेनला शहीद केले व पाकिस्तानला सांगितले देखील नाही. यानंतर संपुर्ण जग पाकिस्तानलाच नावे ठेवत आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या दहशतवादी विरोधी लढ्यात 70 हजार लोकांना गमावले. जे देशाच्या बाहेर होते, त्यांना यामुळे अपमान सहन करावा लागला.

खान म्हणाले की, 2010 नंतर पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले केले जात आहेत. अमेरिकेचे अ‍ॅडमिरल मलन यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सरकारच्या परवानगीनेच असे केले जात असल्याचे सांगितले.

खान यांनी ओसामा बिन लादेनला शहीद ठरविण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील त्यांनी लादेन बाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी त्यांनी लादेनला दहशतवादी मानण्यास नकार दिला आहे. तालिबान्यांना त्यांनी ‘भाऊ’ देखील म्हटले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment