चीनची जिरवण्यासाठी भारतीय लष्कराचा लडाख सीमेरेेषेजवळ युद्धाभ्यास

चीनसोबत सीमावादामुळे तणाव निर्माण झाला असताना लेह येथील भारतीय सैन्य आणि हवाई दलाने युद्धाभ्यास केला आहे. या युद्धाभ्यासात फायटर आणि ट्रांसपोर्ट विमाने सहभागी झाली होती. युद्ध अभ्यासाचा उद्देश दोन्ही सैन्यातील ताळमेळ वाढवणे हा होता. या युद्ध अभ्यासात सुखोई लढाऊ विमान आणि चिनूक हेलिकॉप्टर सहभागी झाले होते. चीनसोबतच्या वाढत्या तणावामुळे एलएसीवर सैन्य संख्या कमी करता येणार नाही. अद्यापही गलवान खोरे, पँगोंग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागात चीनी सैन्य आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

लडाखच्या लेह भागात भारतीय सैन्य आणि हवाई दलात मोठा युद्ध सराव सुरू आहे. यात भारतीय सैन्याचे सुखोई-30 एमकेआय अत्याधुनिक लढाऊ विमाने भाग घेत आहेत. सोबतच सैन्याचे सामान आणि जवानांना वेगाने एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारे हरक्यूलिस आणि वेगवेगळी मालवाहन विमाने देखील सहभागी होत आहेत. लढाऊ विमान, मालवाहक विमान कोऑर्डिनेशन ऑपरेशन चालवत आहेत.

एलएसीवर चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य आणि हवाई दलाचा युद्ध अभ्यास महत्त्वाचा आहे. सैन्याचा हा अभ्यास निरंतर सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment