ICSE, CBSEच्या बोर्डाचे निकाल जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत लावण्याची तयारी


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणामुळे यंदाच्या 10 वी 12वीच्या परीक्षा रद्द करण्याची तयारी सीबीएससी (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाने दाखवली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आज निकालाबाबतही चर्चा झाली आहे. यंदा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड सरासरी गुणदान पद्धतीच्या आधारे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल लावू शकतात अशी माहिती देखील त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बोर्डांकडून सध्या बोर्डाची परीक्षा रद्द झाली असली तरीही सरासरी गुणांप्रमाणे खूष नसलेल्यांसाठी भविष्यात पुन्हा परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाईल, अशी माहितीदेखील आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे. यासंदर्भात आयसीएसई बोर्डाची बाजू मांडणारे वकील जयदीप गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोर्डांची अ‍ॅफिडेव्हिट्स थोड्या फार फरकाने सारखीच आहेत. पण सरासरी गुण देण्याच्या पद्धतींमध्ये थोडा फरक आहे.

Leave a Comment