देशातील पहिली वहिली सोशल डिस्टेंसिंग स्कूटर ‘मिसो’ लाँच

भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी जेमोपाई इलेक्ट्रिकने (Gemopai Electric) देशातील पहिली सोशल डिस्टेंसिंग स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने भारतीय बाजारात मिनी ई-स्कूटर मिसो लाँच केली आहे. मिसो स्कूटरची किंमत 44,000 रुपये आहे. जेमोपाई मिसो इलेक्ट्रिक स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही एक मिनी स्कूटर असून, ज्यात केवळ सिंगल सीट देण्यात आलेली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत एक कॅरियर देखील देण्यात आलेले आहे.

Image Credited – The Financial Express

मिसोमध्ये 48v आणि 1KW च्या डिटेचेबल लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. बॅटरी सिंगल चार्जमध्ये 75 किमी अंतर पार करू शकते. स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किमी असून, कंपनीचा दावा आहे की स्कूटर 2 तासात 90 टक्के चार्ज होते.

Image Credited – Electric Vehicle Web

ही स्कूटर चालविण्यासाठी लायसन्स अथवा आरटीओची परवानगी घेण्याची गरज नाही. कंपनीने मिसो स्कूटरचे बुकिंग सुरू केले असून, पुढील महिन्यापासून डिलिव्हरी सुरू होईल. कंपनीनुसार, ही पुर्णपणे मेड इन इंडिया स्कूटर आहे. स्कूटरमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरी पॅकशिवाय सर्वकाही देशात बनविण्यात आले आहे.

Leave a Comment