कोरोनिलवरुन सुरु असलेल्या वादावर पतंजलीकडून स्पष्टीकरण


नवी दिल्ली – योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद या संस्थेकडून बनवण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक औषध कोरोनिलवरुन सुरु असलेल्या वादावर अखेर पतंजलीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पतंजलीतर्फे लाँच करण्यात आलेल्या कोरोनिल औषधाचा परवाना मिळवताना कोणत्याही गैर मार्गाचा वापर करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर आमच्याकडून चुकीची जाहिरात सुद्धा केलेली नाही, तसेच औषधाचे परिणाम आम्ही सांगितल्याची माहिती पतंजलीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आचार्य बालाकृष्ण यांनी दिली आहे.


कोरोनिल तयार करण्यासाठी आम्ही औषध सर्व प्रक्रियेचे अनुसरण केले आहे. आम्ही औषधात वापरल्या जाणार्‍या घटकांच्या शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे परवान्यासाठी अर्ज केला. आम्ही कंपाऊंडवर काम केले आणि क्लिनिकल चाचणीचा निकाल लोकांसमोर ठेवला यात काहीही चूक नसल्याचे सुद्धा बालाकृष्ण यांनी म्हटले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्या पतंजलीने सादर केलेल्या रिपोर्ट्समध्ये खोकला, ताप आणि इम्युनिटी बुस्टरसाठी परवानगी मागितली होती, त्याचबरोबर त्यामध्ये कोरोनाचा उल्लेख नसल्याचे उत्तराखंड आयुर्वेद विभागाने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पतंजली विरुद्ध नोटिस जारी केली होती. पतंजलीने दिलेल्या रिपोर्टनुसार आम्ही परवाना दिला आहे, त्यामध्ये कोरोना, कोव्हिड 19 चा उल्लेख केला नसल्याचे आयुर्वेद विभागाने अत्यंत स्पष्टपणे म्हटले आहे.

Leave a Comment