पॅनकार्ड हरवले अथवा चोरीला गेले असल्यास असे मिळवा परत

पॅनकार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. मोठे व्यवहार, आयकर भरण्यासाठी पॅनकार्ड गरजेचे आहे. सोबतच पॅनकार्डला आधारसोबत लिंकणे देखील सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे पॅनकार्ड हरवले अथवा चोरीला गेल्यास मोठी समस्या निर्माण होते. मात्र काळजी करण्याची काहीही गरज नाही.

तुम्ही पॅनकार्ड हरवले अथवा चोरीला गेले असल्यास सहज परत मिळवू शकता. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स पॅन सर्व्हिसेजच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरून द्यावा लागेल. मात्र हे डुप्लिकेट पॅनकार्ड असेल. यासाठी स्टेप्स जाणून घेऊया.

  • इनकम टॅक्स पॅन सर्व्हिसेजच्या वेबसाईटवर गेल्यानंतर येथे तुम्हाला रीप्रिंट ऑफ पॅन कार्ड असा पर्याय दिसेल. ज्यांचे आधीपासून पॅनकार्ड आहे, अशांसाठी हा पर्याय आहे.
  • येथे एक फॉर्म दिसेल. हा फॉर्म भरताना डाव्या बाजूच्या कोणत्याही बॉक्समध्ये राइटचे चिन्ह करायचे नाही, याची काळजी घ्या.
  • यानंतर पॅनकार्ड परत येण्यासाठी 105 रुपये फी द्यावी लागेल. क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.
  • फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. या पावतीची प्रिंट काढून त्यावर 2.5X3.5 सेमी आकाराचा रंगीत फोटो लावा व त्यावर तुमची सही करा.
  • जर तुम्ही शुल्क ड्राफ्ट अथवा चेकद्वारे केले असल्यास त्याची कॉपी देखील जोडा. सोबतच आयडी प्रूफ, एड्रेस प्रूफ आणि बर्थडेट प्रूफची कॉपी जोडून एनएसडीएल पुणेच्या कार्यालयाला पाठवा. अर्जानंतर 15 दिवसात तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड मिळेल.
  • कार्डचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही NSDLPAN व स्पेस देऊन पावती क्रमांक टाकून 57575 वर देखील मेसेज करू शकता.

Leave a Comment