आव्हाडांचा बिग बींना चिमटा; आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या?


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश आता हळूहळू अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच या अनलॉकदरम्यान सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. आज सलग 20 व्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे मुंबईकरांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना त्यात त्यांना इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे.


दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनी 24 मे 2012 रोजी इंधन दरवाढीवर ट्विट केले होते. पंपवरील कर्मचारी विचारतो- कितीचे पेट्रोल टाकू? त्यावर मुंबईकर म्हणतो- 2-4 रुपयांचे कारवर शिंपड, जाळून टाकतो, अशा आशयाचे ट्विट बिग बींनी केले होते. त्यावरुन आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमार नंतर अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या?’ असा सवाल बिग बींना विचारला आहे.

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, तुम्ही पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरले की नाही? का तुम्ही बिल पाहिले नाही? ही बोलण्याची वेळ आहे. तुम्ही तरी पक्षपातीपणा करणार नाही, अशी आशा आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या. आव्हाड यांनी या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांना टॅग केले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment