कौतुकास्पद! एक हात नसतानाही दिव्यांग मुलीने गरजूंसाठी शिवले मास्क

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. घराच्या बाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य आहे. अशा स्थिती मास्कची मागणी देखील वाढली आहे. अनेकजण मास्क शिवून गरजू व्यक्तींना वाटत आहेत. अशाच एका कर्नाटकच्या 10 वर्षीय दिव्यांग मुलीने एका हाताने मास्क शिवून विद्यार्थ्यांना वाटले आहे. यासाठी या मुलीचे कौतुक होत आहे.

10 वर्षीय सिंधुरी कर्नाटकच्या उडुपी येथील आहे. ती दिव्यांग आहे. असे असले तरीही तिने एका हाताने मास्क शिवून गरजूंना वाटले आहेत. सिंधुरीने हे मास्क एसएलएससी परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वाटले.

सिंधुरीने आतापर्यंत अनेक मास्क शिवले आहेत. तेही केवळ एका हाताने. सिंधुरीला जन्मापासूनच डाव्या हाताच्या कोपऱ्यापासूनचा भाग नाही. मात्र या गोष्टीमुळे तिने कधीही हार मारली नाही. कोरोना संकटात तिने अनेकांसाठी मास्क बनवले. सिंधुरी सहावीच्या वर्गात शिकते व ती स्काउट अँड गाइड देखील आहे.

सोशल मीडियावर नेटकरी तिच्या या कामाचे भरभरून कौतुक करत आहेत. अनेकजण तिला तिच्या उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे.

Leave a Comment