डोकेदुखीचे औषध खरेदी करण्यासाठी गेलेली महिला, एका निर्णयामुळे क्षणात झाली कोट्याधीश

डोकेदुखीचे औषध घेण्यासाठी स्टोरमध्ये गेलेल्या महिलेने कधीच विचार केला नसेल की त्या काही वेळातच कोट्याधीश होणार आहे. पेनकिलर खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेने मेगा मनी स्क्रेच ऑफ तिकिट खरेदी केले व महिलेचे नशीबच बदलून गेले.

या तिकिटामुळे महिलेला तब्बल 3.77 कोटी रुपयांची (5 लाख डॉलर्स) लॉटरी लागली आहे. अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथे राहणाऱ्या ओलगा रिट्चे या डोकेदुखीचे औषध घेण्यासाठी लोकल स्टोरमध्ये औषध आणण्यासाठी गेल्या होत्या. औषध घेताना त्यांनी एक लॉटरी तिकिट देखील खरेदी केले व तिकिटामुळे त्या काही क्षणात कोट्याधीश झाल्या आहेत.

लॉटरी लागल्यानंतर ओलगा म्हणाल्या की, मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. मी आजारीच पडले होते. या पैशांचे काय करणार असे विचारले असता त्यांनी सांगितले की, याद्वारे आपले घर दुरुस्त करणार आहे व इतर पैसे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी सुरक्षित ठेवणार आहे.

अशाप्रकारे लॉटरी लागणाऱ्या ओलगा पहिल्या महिला नाहीत याआधी देखील एका महिलेने नोकरी गेल्यानंतर ग्रोसरी स्टोरमध्ये पार्ट टाईम नोकरी करताना फेस मास्क शिवून कमवलेल्या पैशाने लॉटरी तिकिट खरेदी केले होते व या तिकिटाद्वारे त्यांना तब्बल 1,27,000 डॉलर्सची लॉटरी लागली होती.

Leave a Comment