सुशांतच्या अंतिम पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झाले मृत्यूचे खरे कारण


14 जूनला मुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस करीत आहेत. दरम्यान सुशांतच्या पोस्टमॉर्टमचा अंतिम रिपोर्ट पोलिसांना मिळाला असून यासाठी मुंबईतील पाच डॉक्टरांच्या टीम नियुक्त करण्यात आली होती. यासंदर्भातील वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे. दरम्यान एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार सुशांतच्या शरीरावर कोणताही संघर्ष किंवा दुखापतींचा निशान सापडलेले नाहीत. त्याच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्यामुळे गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची नखेही स्वच्छ आढळली आहेत. रिपोर्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी त्याचे वडील, बहिणी, नोकर, मॅनेजर, रिया चक्रवर्तीसह अनेकांचा जबाब नोंदवून घेतला आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना राणावतसह मोठमोठ्या दिग्दर्शकांनी सुशांतचा मृत्यू नाही हत्या असल्याचे आरोप केले. 17 जूनला बिहारमध्ये सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा,भूषण कुमार त्यांच्याविरोधात खटलाच दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतला आणि अन्य काही लोकांना याप्रकरणी साक्षीदार बनविण्यात आले आहे.

Leave a Comment