त्वरित रक्तपुरवठा होण्यासाठी फायदेशीर ठरणार ‘eBloodServices’ मोबाईल अॅप


नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रक्तदानासाठी आवश्यक असलेल्या रक्ताचा पुरवठा त्वरित व्हावा यासाठी नवीन मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. C-DAC India च्या टीमने हे मोबाईल अॅप डेव्हलअप केले असून यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला असून या अॅपचे ‘eBloodServices’ असे नाव आहे.


eBloodServices आज मी लॉन्च करत आहे. या अॅपमुळे रक्ताचा पुरवठा सुलभ होईल. या अॅपमध्ये जर कोणी रक्ताची गरज असल्याची मागणी केली तर त्या व्यक्तीला कोणत्या ब्लड बँकेत रक्त उपलब्ध आहे, हे अॅपमधील ‘ERatkosh’ डॅशबोर्डमध्ये दिसेल. त्यामुळे लवकरात लवकर रक्ताचा पुरवठा करण्यास मदत होईल, असे हर्षवर्धन यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याचबरोबर हे अॅप गरजूंसाठी वरदान ठरेल.

विविध आरोग्य कार्यक्रमाद्वारे सरकारला इंडियन रेड क्रॉस यांनी नेहमीच मदत केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी केलेली ही मदत खूपच फायदेशीर ठरणार आहे. गरजूंना या अॅपद्वारे लवकरात लवकर रक्त मिळण्यास नक्कीच मदत होईल. सध्याच्या घडीला हे अॅप दिल्ली-एनसीआर या भागात कार्यरत असेल. त्याचबरोबर या अॅपच्या माध्यमातून युजर एका वेळेस 4 युनिट्सपर्यंत ऑर्डर करु शकतील. हे एक उपयुक्त अॅप असून हे अॅप लवकरच देशाच्या इतर राज्यातही सुरु केले जाईल, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

Leave a Comment