व्हायरल; सुशांतच्या मृत्युनंतर अशा स्थितीत आहेत त्याचे वडील

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक आठवड्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. आपल्या अभिनयाद्वारे लोकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या या अभिनेत्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्याचे चाहते अद्याप सावरलेले नाहीत. त्याच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशीची देखील मागणी केली जात आहे. सुशांतच्या प्रार्थना सभेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर लोकांचे ध्यान आकर्षित करत आहे. या फोटोमध्ये सुशांतचे वडील आपल्या मुलाच्या फोटोजवळ बसलेले दिसत आहेत. खिन्न अवस्थेत बसलेल्या सुशांतच्या वडीलांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोला सुशांतच्या फॅनपेजने ट्विटरवर शेअर केले आहे. सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह हे मुलाच्या फोटोजवळ हतबल, दुःखी स्थितीमध्ये बसलेले आहेत. हा फोटो पाहून कोणाचेही मन हेलावून जाईल.

काही दिवसांपुर्वीच सुशांतच्या पटना येथील घरी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात कुटुंब, जवळचे नातेवाई आणि काही मोजके मित्र सहभागी झाले होते. प्रार्थना सभेतील सुशांतचा फोटोला हार असलेली पोस्ट व्हायरल होत आहे. चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment