पृथ्वीवरील ‘स्वर्ग’ वाचविण्यासाठी 7 वर्षांच्या मुलीचा पुढाकार, पाठ्यपुस्तकात घेण्यात आली दखल

जम्मू-काश्मिरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. येथील डल सरोवर प्रसिद्ध आहे. पर्यटक खास बोटिंगसाठी येथे येत असतात. जे पर्यटक श्रीनगरला जातात, ते या सरोवरला नक्कीच भेट देतात. या सरोवरात घाण देखील भरपूर आहे. मात्र एका सात वर्षांच्या मुलीने हे सरोवर साफ करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. या 7 वर्षीय मुलीचे नाव जन्नत असून, ती मागील दोन वर्षांपासून डल सरोवराची सफाई करत आहे.

2 वर्षांपासून सरोवर साफ करण्यासाठी काम करणाऱ्या जन्नतची गोष्ट पाठ्यपुस्तकात देखील छापण्यात आली आहे. तिची गोष्ट हैदराबाद येथील शाळेतील पाठ्यक्रमात छापण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून रोज शाळा सुटल्यावर आपल्या वडीलांसोबत छोट्याशा बोटीत बसून जन्नत सरोवराची साफसफाई करते.

आपल्या या कामाविषयी जन्नत म्हणाली की, वडिलांपासून मला सरोवराची साफसफाई करण्याची प्रेरणा मिळाली. माझी ओळख माझ्या वडिलांमुळेच आहे.

आपल्या नावाप्रमाणेच ही चिमुकली पृथ्वीवरील ‘जन्नत’ स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत आहे. तिच्या या कार्याचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

Leave a Comment