देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात विक्रमी नोंद; 24 तासात 16922 रुग्ण वाढ


नवी दिल्ली : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत असल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आज आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 लाख 73 हजार 105 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत या रोगामुळे 14894 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 2 लाख 71 हजारांहून अधिक लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्याचबरोबर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 86 हजारांहून अधिक आहे.

त्यातच मागील 24 तासांत देशात 16 हजार 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत आणि 418 लोकांचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 75 लाख 60 हजार 782 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 7 हजार 871 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाची 1 लाख 42 हजार 900 प्रकरणांची नोंद झाली असून त्यामध्ये 6739 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 73 हजार पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सक्रिय प्रकरणांची संख्या 62 हजारांपेक्षा जास्त आहे.

Leave a Comment