दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान अद्यापही नंदनवन – अमेरिका

दहशतवादाचा गड असलेला पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने 2019 मध्ये दहशतवाद्यांचा आर्थिक निधी रोखणे आणि मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर असे हल्ले रोखण्यासाठी भारत केंद्रीत दहशतवादी संघटनांच्या विरोधात ठोस पावले उचलले नाहीत. पाकिस्तान अद्यापही सक्रिय दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, राष्ट्रपती ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला जाणारा आर्थिक निधी जानेवारी 2018 मध्ये रोखला होता व हा निर्णय 2019 मध्ये देखील कायम ठेवला. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना रोखण्यासाठी ठोस पावले उचलेली नाहीत. पाकिस्तानने दहशतवादाचा तीन आर्थिक निधी प्रकरणात लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईदला दोषी ठरवले. मात्र अन्य दहशतवादी संघटनांसाठी अद्याप पाकिस्तान सुरक्षित ठिकाण आहे.

अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तान अफगान तालिबान आणि हक्कानी नेटवर्कला आपल्या जमिनीवर संचालन करू देतो. या संघटना अफगानिस्तानला निशाणा बनवतात. तसेच भारताला निशाणा बनवणाऱ्या लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद अशा संघटनांना जमीन वापरण्याची परवानगी देतो. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, मसूज अजहर आणि 2008 च्या मुंबई हल्ल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर साजिर मीरवर काहीही कारवाई करण्यात आली नाही.

Leave a Comment