खुशखबर! लवकरच येणार कोरोनावरील लस, ऑक्सफोर्ड ट्रायलच्या अंतिम टप्प्यात

जागतिक आरोग्य संघटनेने 22 जूनला कोव्हिड-19 संदर्भात ड्राफ्ट लँडस्केप जारी केला आहे. यानुसार कोरोना व्हायरसवरील 13 वॅक्सिन क्लिनिकल एव्हॅल्युशनमध्ये आहेत. ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी लसीचे मानवी ट्रायल याआधीच सुरु केले आहे. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या लसीचे मानवी ट्रायल लवकरच सुरू होणार आहे. डेव्हलपमेंटनुसार सांगायचे तर ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी आणि AstraZeneca Plc. ची लस अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यात पोहचणारी ही कोरोनावरील पहिली लस आहे. तर इतर 12 लसी अद्याप पहिल्या अथवा दुसऱ्या टप्प्यात आहेत.

ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी आणि AstraZeneca Plc. ची प्रायोगिक लस क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यात पोहचली असून, ChAdOx1 nCov-19 लस आतापर्यंत 10,260 लोकांना देण्यात आली आहे. या लसीचे ट्रायल ब्रिटनशिवाय दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये देखील सुरू आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतासाठी मोठ्या प्रमाणात लस बनविण्यासाठी 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही लस ChAdOx1 व्हायरसद्वारे बनविण्यात आली आहे. हा व्हायरस सर्दी देणाऱ्या व्हायरसचे एक स्वरूप आहे. याला जेनेटिकली बदलण्यात आले आहे, ज्यामुळे याचा मनुष्यावर परिणाम होत नाही. जर अंतिम ट्रायल यशस्वी झाल्यास या वर्षाच्या अखेरपर्यंत लस बाजारात येण्याची शक्यता आहे.

चीन आणि अमेरिकेत बनणाऱ्या कोरोनावरील लस सध्या पहिल्या अथवा दुसऱ्या टप्प्यात आहेत. अमेरिकेच्या नॅशनल इंस्‍टिट्यूट ऑफ एलर्जी अँड इन्‍फेक्शियस डिजिज आणि मोडेर्ना इंक. ची लस देखील दुसऱ्या टप्प्यात आहे. याचे रेग्युलेटरी स्‍टेट्स फेज 1 आहे.

Leave a Comment