इस्रोचा मोठा निर्णय ; आता देशातील खासगी कंपन्यांही करु शकणार सॅटलाईटसह रॉकेटची बांधणी


नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने खासगी कंपन्यांसाठी अवकाश संशोधन क्षेत्र खुले केल्यामुळे आता यापुढे खासगी क्षेत्रातील कंपन्या देखील सॅटेलाईट निर्मितीसह रॉकेट बांधणी तसेच सॅटेलाईट लाँचिंग सारख्या सेवाही सुरु करु शकणार असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी दिली आहे.

आता इस्रोच्या मोहिमांचा खासगी क्षेत्राला सुद्धा भाग होता येईल, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अवकाश मोहिमा आणि संशोधनामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला मंजुरी दिली होती. खासगी क्षेत्राला परवानगी दिली म्हणून इस्रो आपले काम कमी करणार नाही. इस्रोच्या अवकाश संशोधन आणि मानवी मोहिमा सुरुच राहतील असे सिवन यांनी स्पष्ट केले.

मानवी अवकाश मोहिम, चंद्रयान-३ या प्रकल्पांना कोरोना व्हायरसमुळे विलंब होणार आहे. त्याचबरोबर या वर्षातील १० अवकाश मोहिमांवर परिणाम झाल्याचे सांगितले. आमच्या मोहिमांवर लॉकडाउनचा काय परिणाम झाला, त्याचा आढावा इस्रो घेईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment