आयकर परताव्यासह आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ


नवी दिल्ली – केंद्र सरकारने बुधवारी आयकर परतावा (आयटीआर) करण्यास एक महिन्याची मुदत वाढ देत असल्याची घोषणा केल्यामुळे करदात्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता ३१ जुलै २०२० ही आर्थिक वर्ष २०१८-१९साठी आयटीआर भरण्याची नवी तारीख असणार आहे.
दरम्यान, यापूर्वीच केंद्राकडून आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आयकर परतावा भरण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास एक वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध गुंतवणूकी आणि आय-टी कायद्यांतर्गत कपात करण्याचा दावा करण्याची मर्यादादेखील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अधिसूचनेद्वारे एक महिन्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविली आहे.

  • ३१ जुलै, २०२० पर्यंत आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी मूळ तसेच सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
  • ३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी प्राप्तिकर परताव्याची मुदत तारीख वाढविण्यात आल्यामुळे ३१ जुलै २०२० आणि ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत भरलेल्या उत्पन्नाचा परतावा ३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत भरता येईल. यामुळे टॅक्स ऑडिट अहवाल देण्याची तारीखही ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  • लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यासाठी, करदात्यास १ लाखापर्यंतचा सेल्फ असेसमेंट टॅक्स भरण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर सेल्फ असेसमेंट टॅक्सची रक्कम १ लाखापेक्षा जास्त असलेल्या करदात्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही, हे देखील आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
  • आयकर कायद्यानुसार कलम ८०सी नुसार ३१ जुलै पर्यंत (एलआयसी, पीपीएफ, एनएससी इ.), ८० डी (मेडिक्लेम), ८० जी (देणगी) यांच्या वजावटीसाठी दावा करण्यासाठी विविध गुंतवणूक/पेमेंट करण्याच्या तारखेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

Leave a Comment