हा पठ्ठ्या चक्क लँबोर्गिनीमधून करतो आंब्यांची डिलिव्हरी

सर्वसाधारणपणे एखाद्या वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी लोक बाईक किंवा सायकलचा वापर करतात. मात्र दुबईमध्ये फळांचा राजा असलेल्या आंब्याची डिलिव्हरी देखील अगदी राजेशाही थाटात केली जात आहे. येथील एक कंपनी चक्क स्पोर्ट्स कार लँबोर्गिनीमधून घरोघरी आंब्यांची डिलिव्हरी करत आहे. दुबई स्थित पाकिस्तान सुपर मार्केटने हटके पाऊल उचलले असून, ते दर गुरुवारी लँबोर्गिनीद्वारे कारची डिलिव्हरी करतात.

पाकिस्तानी सुपर मार्केटचे मॅनेजिंग डायरेक्टर मोहम्मद झनजेब यासिन हे स्वतःच्या लग्झरी कारने ग्राहकांपर्यंत आंबे पोहचवतात. त्यांचे म्हणणे आहे की राजाला राजा प्रमाणेच प्रवास करायला हवा. ग्राहकांना एका विशिष्ट ऑर्डरमध्ये आंब्यांसोबतच या लग्झरी गाडीमधून प्रवास करण्याची देखील संधी मिळते.

(व्हिडीओ सौजन्य – गल्फ न्यूज)

यासिनने हे पाऊल पैसे अथवा नाव कमविण्यासाठी नाही तर आपल्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी उचलले आहे. यासिन म्हणाला की, आमचा उद्देश लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि त्यांना स्पेशल असल्याची जाणीव करून देणे हा आहे.

त्याने सांगितले की, कोव्हिड-19 मुळे घरात कैद असलेल्या लहान मुलांसाठी हे मजेशीर आहे. प्रत्येक ऑर्डरसाठी 1 तास लागतो. एका दिवसात अशा 7 ते 8 घरी डिलिव्हरी करतो.

Leave a Comment