कोरोना इफेक्ट; ही एअरलाईन करणार तब्बल 6 हजार कर्मचाऱ्यांची कपात

कोरोना व्हायरस महामारीचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मागील 3-4 महिन्यात झालेल्या नुकसानीमुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. आता ऑस्ट्रेलियाची क्वांटास एअरलाईन कंपनीने कमीत कमी 6 हजार कर्मचाऱ्यांन कामावरून काढून टाकणार आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील विमानसेवा सध्या ठप्प आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने एअरलाईन्सला मोठे नुकसान होत आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या एअरलाईन्सला देखील याचा फटका बसला आहे.

क्वांटास एअरलाईनने आपल्या 15 हजार कर्मचाऱ्यांचा सुट्टीचा कालावधी देखील आणखी वाढवला आहे. याशिवाय कंपनीने आपली 100 विमाने एक वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक काळासाठी उड्डाण घेणार नसल्याचे सांगितले आहे. कंपनी आपल्या सहा शिल्लक बोईंग 747 विमानांना देखील त्वरित हटवणार आहे.

या संदर्भात एअरलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन जॉयसी म्हणाले की, मागील काही वर्षात कमी उत्पन्नामुळे एअरलाईनला मोठे नुकसान झाले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे त्यांच्या करिअरमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. आम्ही जे पाऊल उचलत आहोत, त्यामुळे आमच्या हजारो लोकांवर परिणाम होणार आहे.

Leave a Comment