चीनच्या कुरापती सॅटेलाईटने केल्या उघड, अद्यापही गलवान खोऱ्यात देत आहे धोका

मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे चीन हा वाद मिटविण्यासाठी मुत्सदी व सैन्य स्तरावर चर्चा करत आहे. तर दुसरीकडे पुर्व लडाखमधील पँगोंग सो, गलवान खोरे आणि इतर भागांध्ये सैन्य वाढवत आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनने गलवान खोऱ्या सैन्य संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेटेलाईट फोटोवरून खुलासा झाला आहे की ज्या ठिकाणी 15 जूनला भारत-चीन सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता, तेथे आता चीनने मोठ्या संख्येत कॅम्प लावले आहेत.

Image Credited – navbharattimes

भारताचा विरोध असतानाही चीनी सैन्यांने पुन्हा एकदा पेट्रोलिंग पॉईंट 14 च्या आजुबाजूला काही गोष्टी उभारल्या आहेत. पँगोंग सो आणि गलवान खोऱ्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्य देमचॉक, गोगरा हॉट स्प्रिंग आणि दौलत बेग ओल्डी येथे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Image Credited – navbharattimes

15 जूनला संघर्षानंतर चीनने पेट्रोलिंग पॉईंट 14 येथील पोस्ट रिकामी केली होती. येथे खूप कमी प्रमाणात चीनी सैन्य होते. मात्र आता चीनने चर्चेच्या नावाखाली पुन्हा एकदा येथील सैन्य वाढवले आहे. एवढेच नाही तर पोस्टपर्यंत सामान घेऊन जाण्यासाठी एका रस्त्याची देखील निर्मिती केली आहे. नदीच्या कडेने चीनने हा रस्ता बनवला असल्याचे सेटेलाईट फोटोमध्ये दिसत आहे.

अमेरिकेच्या स्पेस टेक्नोलॉजी फर्म मॅक्सार टेक्नोलॉजीच्या सेटेलाईट फोटोमध्ये दिसत आहे की चीनने गलवान खोऱ्यातून आपले सैन्य मागे घेतलेले नाही.

 

Leave a Comment