सीएसकेने शेअर केले 12 खेळाडूंचे फिमेल व्हर्जन; मुश्किल होईल तुम्हाला हसू आवरणे

सध्या सोशल मीडियावर फेसअ‍ॅपद्वारे क्रिकेटपटूंचा महिला अवतार असलेले फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. युजवेंद्र चहलने रोहित शर्माचे फीमेल व्हर्जन फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर युवराज सिंह, हरभजन सिंह यांनी देखील इतर खेळाडूंचे फिमेल व्हर्जन शेअर केले होते. सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच गाजले होते. आता चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) आपल्या संघातील 12 खेळाडूंचा फीमेल व्हर्जन फोटो शेअर केला आहे.

सीएसकेने सोशल मीडियावर एका फोटोमध्ये 12 क्रिकेटपटूंचा कोलाज शेअर केला आहे. यात सर्व क्रिकेटपटूंना ओळखणे अवघड आहे. या फोटोंमध्ये महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, शेन वॉट्सन, अंबाती रायडू, केदार जाधव, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, फॅफ डू प्लेसी, दीपक चहर, मिशेल सेंटनर, लुंगी एनगिडी आणि ड्वेन ब्रोवा या क्रिकेटपटूंचे फीमेल व्हर्जन आहे.

सुरेश रैनाला शार्दुल ठाकरूचा फीमेल व्हर्जनमधील फोटो एवढा आवडला की, त्याने आम्ही दोघे लवकरच कॉफी प्यायला जावू, अशी पोस्टवर कमेंट केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

याआधी युवराज सिंह आणि हरभजन सिंहने देखील संघातील आजी-माजी खेळाळूंडे फीमेल व्हर्जन शेअर केले होते.

Leave a Comment