अमिताभ बच्चन यांनी मास्कसाठी शोधला ‘हा’ हिंदी शब्द, उच्चार करणेही अवघड

लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली असली तरी कोरोना व्हायरसची भिती नागरिकांमध्ये अजूनही दिसून येत आहे. लोक आवश्यक काम नसल्यास घराच्या बाहेर जाणे टाळत आहेत. बाहेर जातानाही लोक मास्क लावत आहे. मात्र या मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे ? नाही ना ? मात्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मास्कसाठी खास हिंदी शब्द शोधला आहे.

अमिताभ बच्चन यांनी शोधलेला हा शब्द एवढा मोठा आहे अक्षरांचा विक्रम होईल. खास गोष्ट म्हणजे याचे उच्चारण देखील सोपे नाही. बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मास्क लावलेला दिसत आहे व मास्कवर त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट गुलाबो-सिताबोचे पोस्टर छापलेले आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, सापडला सापडला सापडला खूप मेहनतीनंतर अखेर मास्कचा भाषांतर सापडले. हिंदीमध्ये – “नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका!’

सोशल मीडिया त्यांची ही पोस्ट आणि मास्कसाठी शोधलेला हिंदी शब्द चांगलाच चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी हा शब्द शोधण्यासाठी त्यांचे कौतुक केले.

Leave a Comment