आता ई-कॉमर्स कंपन्या सांगणार कोणत्या देशात बनली आहे वस्तू

मागील काही दिवसांपासून चीनसोबत सुरू असलेल्या वादामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढली आहे. मेड इन इंडिया वस्तूंना प्राधान्य द्या व चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाका, असे वारंवार ऐकायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशातील दिग्गज ई-कॉमर्स कंपन्या अ‍ॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट आपल्या रिटेलर्सला वस्तूंवर त्याच्या मूळ देशाच्या नावाची माहिती देण्यास सांगणार आहे. म्हणजेच वस्तूची निर्मिती कोठे झाली आहे याची माहिती मिळेल.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, यावर चर्चेसाठी ऑनलाईन रिटेलर्सची एक व्हिडीओ कॉन्फ्रेंस पार पडली. या बैठकीचे आयोजन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने केले होते. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह देशातील इतर ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या वस्तूंवर मूळ देशाचे नाव दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 2 आठवड्यांच्या आत हा निर्णय लागू होईल.

भारत-चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून, यामुळे उत्पादनाची निर्मिती कोणत्या देशात झाली आहे हे समजेल. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने देखील त्याच्या विक्रेत्यांना सर्व उत्पादनांसाठी मूळ देशाचे नाव दाखवण्यास सांगणार आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment