12 वर्षीय विद्यार्थ्याने चक्क रद्दीपासून बनवली रेल्वे, मंत्रालयानेही केले कौतुक

केरळच्या एका 12 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या कामाने रेल्वे मंत्रालयाकडून शाबासकी मिळवली आहे. अद्वैत कृष्णा नावाच्या या विद्यार्थ्याने चक्क वृत्तपत्राच्या पानांद्वारे रेल्वेचे एक मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल एवढे शानदार आहे की रेल्वे मंत्रालयाने याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. नेटकऱ्यांना देखील रेल्वेचे हे मॉडेल खूपच आवडले.

Master Adwaith Krishna, a 12 year old rail enthusiast from Thrissur, Kerala has unleashed his creative streak and has…

Posted by Ministry of Railways, Government of India on Wednesday, June 24, 2020

फेसबुकवर अद्वैतच्या मॉडेलचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रेल्वे मंत्रालयाने लिहिले की, केरळच्या तृश्शूर येथे राहणाऱ्या 12 वर्षीय अद्वैत कृष्णाला रेल्वेगाड्या खूप आवडतात. तो एवढा क्रिएटिव्ह आहे की त्याने तीन दिवसात वृत्तपत्राच्या पानांद्वारे रेल्वेचे उत्तम मॉडेल बनवले आहे.

मंत्रालयाने ट्विटरवर देखील याचा व्हिडीओ शेअर केला. ट्विटरवर या व्हिडीओला आतापर्यंत 30 हजारांपेक्षा अधिक जणांनी बघितले असून, नेटकऱ्यांनी 12 वर्षीय अद्वैतच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक केले.

Leave a Comment