हे राज्य 26 जूनला एकाचवेळी तब्बल 1 कोटी लोकांना देणार रोजगार

उत्तर प्रदेश सरकार येणाऱ्या 26 जूनला एकसोबत 1 कोटी लोकांना रोजगार देण्याच्या योजनेवर काम करत आहे. 1 कोटी लोकांना पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत रोजगार दिला जाणार आहे. नोकरी मिळवणाऱ्यांमध्ये 50 टक्के लोक मनरेगा अंतर्गत नोदणी केलेले असतील. उत्तर प्रदेश हे पहिले असे राज्य असेल, जे एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध करणार आहे. मनरेगा व्यतिरिक्त स्किल्ड वर्कर्स स्वरूपात उद्योग, कंपन्या आणि इतर संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. एकट्या रियलेटर कंपनी नरेडकोने सरकारला 1 लाख लोकांना नोकरी देण्याचे वचन दिले आहे.

या रोजगार अभियानमध्ये उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांना जोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी देखील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या योजनेची समिक्षा केली. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी एखाद्या राज्याशी संबंधित आयोजनात सहभागी होणार आहेत.

उत्तर प्रदेश सरकारकडे लाखो अप्रवासी कामगारांचा डेटा बँक मॅपिंग तयार आहे. या कामगारांना एमएसएमई, एक्सप्रेस-वे हायवे, यूपीडा, मनरेगा इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देखील दिल्या आहेत. सरकारला आता हा आकडा 1 कोटींच्या पुढे घेऊन जायचा आहे.

Leave a Comment