लाकडाचे ओंडके उतरविण्यासाठी लोकांनी चक्क उचलला ट्रक, व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले हैराण

ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले आनंद महिंद्रा हटके व इनोव्हेटिव्ह व्हिडीओ आपल्या फॉलोअर्ससाठी शेअर करत असतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर केला असून, हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टिपर ट्रकमधील लाकडं उतरवण्यासाठी लोक चक्क जीपलाच वरती उचलतात.

टिप्पर ट्रक ज्याला डंप ट्रक देखील म्हणतात. यात मागील बाजूला ठेवलेले सामान सहज उतवरता येते. मात्र या व्हिडीओमध्ये दिसत आहे की जीप लाकडांनी भरगच्च भरलेली आहे व ती लाकडाचे ओंडके खाली करण्यासाठी लोक चक्क जीपच उचलतात. विशेष म्हणजे या वेळी गाडी सुरुच असते.

महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आय मला हा व्हिडीओ दिसला. क्रेझी. त्यांनी सर्वात स्वस्त ट्रिपर ट्रक बनवला. सुरक्षा आणि लोडिंग नियमांचे उल्लंघन केले. ट्रकला उचलून धरणाऱ्यांसाठी हे धोकादायक आहे. तरीही मी आश्चर्यचकित आहे की कोणतेही संसाधन नसताना कसे सर्व गोष्टी करतात.

सोशल मीडियावर या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले असून, अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a Comment