आता कोरोनावर ‘सिद्ध चिकित्सा’द्वारे उपचार, 100% परिणामकारक-तामिळनाडू सरकारचा दावा

देशात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी त्यांची कंपनी पतंजलीने या आजारावरील औषध शोधल्याचा दावा केला आहे. आता तामिळनाडूमध्ये प्राचीन आयुर्वेदिक उपचार पद्धत सिद्ध चिकिस्ताद्वारे या व्हायरसवर मात करता येत असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा स्वतः तामिळनाडू सरकारने केला आहे. राज्याच्या एका मंत्र्याने दावा केला आहे की लक्षण नसलेली आणि थोडीफार लक्षण असलेले रुग्ण या उपचाराद्वारे 100 टक्के बरे झाले आहेत. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

तामिळनाडू सरकारनुसार, ज्यांना कोरोनाची थोडीफार लक्षण आहेत, त्यांच्यावर सिद्ध उपचाराद्वारे 100 टक्के परिणाम झाला आहे. तामिळनाडूचे मंत्री पंड्याराजन यांनी एका चॅनेलशी बोलताना सांगितले की, सिद्ध उपचाराद्वारे बरे होण्याचा दर 100 टक्के आहे. आम्ही कोणत्याही रुग्णाचे प्राण धोक्यात टाकत नाही आहोत. सिद्ध आमच्यासाठी ट्रंप कार्ड आहे. आम्ही सिद्ध, योग आणि आयुर्वेदच्या मिश्रणाचा प्रयोग करत आहोत.

राज्य सरकारने 25 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी सिद्ध पद्धतीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. मंत्र्याने सांगितले की, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांसाठी हे नाही. आरोग्य विभागाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाचे अगदी तुरळ लक्षण आहेत व जे इच्छुक आहेत, अशांवरच आम्ही हा उपचार करत आहोत. मात्र एलोपॅथी डॉक्टरांनी याबाबत चेतावणी दिली असून, याचे कोणतेही वैज्ञानिक परिक्षण नाही.

सिद्ध इलाज काय आहे ?

तामिळनाडूमध्ये प्रचलित सिद्ध चिकित्सा पारंपारिक आणि प्राचीन उपचार पद्धत आहे. तणाव, झोप न येणे, रक्तदाब अशा आजारांसाठी याद्वारे उपचार घेतला जातो. ही पद्धत 4 हजार वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. 18 आचार्यांना याचे जनक मानले जाते.

Leave a Comment