सलमानची पाठराखण करणारा सुनील ग्रोवर झाला ट्रोल, ट्रोलर्सला दिले अनोख्या अंदाजात उत्तर


सलमान खान आणि बॉलिवूडमधील इतर कलाकारांवर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. सोशल मीडियावर सलमानला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आल्यानंतर सुशांतला सलमानने ट्विट करत श्रद्धांजली वाहिली होती. अभिनेता सुनिल ग्रोवरने देखील त्याच्या या ट्विटला पाठिंबा देत ट्विट केले होते. पण सलमानला सुनिलने पाठिंबा देणे नेटकऱ्यांच्या पचनी न पडल्यामुळे सुनिलला देखील त्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.


सलमान मला आवडतो आणि मी त्याचा आदर करतो, असे आपल्या ट्विटमध्ये सुनिलने म्हटले होते. त्याच्या ट्विटनंतर त्यालाही सोशल मीडयावर ट्रोल करण्यात आले होते. पण ट्रोलर्सला सुनिलने चांगलेच सुनावले आहे. सुनिलने त्याला ट्रोल केल्यानंतर पुन्हा एक ट्विट केले आहे. मला आता पेड ट्रोलर्सला कामाला लावण्यास मजा यायला नको. हे देवा मला आता नव्या मनोरंजनपासून वाचव, असे त्याने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment