स्टार किड्सने ट्रोलर्सला वैतागून उचलले एक महत्वपूर्ण पाऊल - Majha Paper

स्टार किड्सने ट्रोलर्सला वैतागून उचलले एक महत्वपूर्ण पाऊल


१४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. वयाच्या ३४व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेकांनाच धक्का बसला. पण सोशल मीडियावर त्याच्या निधनानंतर घराणेशाही हा वाद सुरु झाला आहे. त्यानंतर अनेक स्टार किड्सला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यावर आता ट्रोलर्सला वैतागून स्टार किड्सने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नेटकऱ्यांनी घराणेशाही वाद सुरु झाल्यानंतर स्टार किड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अनेकांनी त्यांना अनफॉलो करण्यास सुरुवात केली तर काहींनी त्यांना कमेंट करत झापण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता अभिनेत्री आलिया भट्ट, करिना कपूर, करण जोहर यांनी इन्स्टाग्रामवर कमेंट सेक्शन सर्वसामान्य यूजरसाठी बंद केल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

आता स्टार किड्सच्या फोटोंवर यूजर्सला कमेंट करता येणार नाही. फक्त स्टार किड्स फॉलो करत असलेले लोक त्यांच्या फोटोंवर कमेंट करु शकतात. शाहरुखनची मुलगी सुहाना खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचा देखील या स्टार किड्समध्ये समावेश आहे. त्या पूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने देखील नेटकऱ्यांसाठी कमेंट बॉक्स बंद केला होता.

Leave a Comment