शेखर सुमनने केली सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी


हिंदी सिनेसृष्टीत सुशांत सिंग राजपूतने केलेल्या आत्महत्येनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातच बॉलीवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाहीवरुनही वाद सुरु आहेत. पण सुशांतने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहीली असणार, त्यामुळे त्याच्या आत्महत्येची सीबीआयद्वारे चौकशी व्हावी, असे मत ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत शेखर यांनी ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, सुशांतसारखा इतका हुशार, आणि प्रबळ इच्छा शक्ती असलेल्या व्यक्तीने जर आत्महत्या केली तर नक्कीच त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असणार. मला मनापासून वाटत आहे, जे आपल्याला दिसत आहे, त्यापेक्षा परिस्थिती बरीच वेगळी आहे. आता शेखर सुमन यांनीही सुशांतला न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे. #जस्टिसफॉरसुशांतफोरम अशी फोरम शेखर यांनी तयार केली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा सीबीआयद्वारे तपास व्हावा अशी मी सरकारकडे मागणी करतो. अशाप्रकारची गटबाजी आणि माफिया बंद व्हायला पाहिजेत. यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज असल्याचे, शेखर सुमन यांनी म्हटले आहे.

Leave a Comment