एसबीआयमध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी, विना परिक्षा निवड, 1 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज

स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशल कॅडर अधिकाऱ्यांच्या 119 जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. 23 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवार 13 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात.

पदे –

SME क्रेडिट एनालिस्ट – 20, प्रोडक्ट मॅनेजर – 06, मॅनेजर (डाटा एनालिस्ट) – 02, मॅनेजर (डिजिटल मार्केटिंग) – 01, फॅकल्टी, SBIL, कोलकाता – 03, सीनियर एग्जिक्यूटिव्ह (डिजिटल रिलेशन्स) – 02, सीनियर एग्जिक्यूटिव्ह (एनालिटिक्स) – 02, सीनियर एग्जिक्यूटिव (डिजिटल मार्केटिंग) -02, बँकिंग सुपरवाइजरी स्पेशलिस्ट – 01, मॅनेजर- एनीटाइम चॅनल – 01, डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) – 08, वॉइस प्रेसिडेंट (स्ट्रेस्ड एसेट्स मार्केटिंग) – 01 चीफ मॅनेजर (स्पेशल सिचुएशन टीम) – 03, डेप्युटी मॅनेजर (स्ट्रेस्ड एसेट्स मार्केटिंग) – 03, हेड (प्रोडक्ट, इन्वेस्टमेंट आणि रिसर्च) – 01, सेंट्रल रिसर्च टीम (पोर्टफोलियो एनालिसिस आणि डाटा एनालिटिक्स) – 01, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – 01, इन्वेस्टमेंट ऑफिसर – 09 , प्रोजेक्ट डेवेलपमेंट मॅनेजर (टेक्नोलॉजी) – 01, रिलेशनशिप मॅनेजर – 48, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – 03

वयाची अट –

पदांनुसार वयाची अट ही किमान 25 वर्ष ते 50 वर्ष आहे. वेगवेगळ्या पदांसाठी वयाची अट वेगवेगळी आहे.

शिक्षण –

वेगवेगळ्या पदांनुसार वेगळी शिक्षणाची अट असून, किमान मान्यता प्राप्त विद्यापाठीतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

परिक्षा –

या पदांसाठी कोणत्याही प्रकारची लिखित स्वरूपात परिक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारावर होईल. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वर्षाला 6 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा पगार मिळेल. GEN/EWS & OBC वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 750 असून, इतर वर्गांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. इच्छुक व पात्र उमेदवार अर्जासाठी व अधिक माहितीसाठी sbi.co.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Leave a Comment