62 एन्काउंटर करणाऱ्या या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने केली आत्महत्या

बिहार पोलीस दलात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे निवृत्त डीएसपी कृष्ण चंद्रा यांनी पटना येथील आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पटनाच्या बेउर भागात त्यांनी लायसन्स बंदुकीद्वारे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चंद्रा हे बिहार पोलीस दलात तेजतर्रार अधिकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आतापर्यंत 62 एन्काउंटर केले होते. यावेळी त्यांना 2 वेळा गोळी देखील लागली होती.

घटनेच्या वेळी चंद्रा हे घरातील वरच्या खोलीत होते, तर त्यांचे कुटुंब खालच्या रुममध्ये होते. गोळीचा आवाज ऐकल्यावर त्यांचे कुटुंब पाहण्यासाठी गेले असता, ते बेशुद्ध पडले होते. सुसाइड नोटमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येची कारणे देखील सांगितली. चंद्रा यांचे शेजाऱ्यांबरोबर वाद होते, त्यामुळे ते तणावात असल्याचे सांगितले जाते. ते अनेक दिवसांपासून मानसिक तणावातून जात होते. याचा उल्लेख त्यांनी सुसाइड नोटमध्ये देखील केला आहे.

बिहार पोलीस दलात 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी 62 एन्काउंटर केले होते. चंद्रा यांच्या सहकाऱ्यांनुसार ते 1975 मध्ये सब-इंस्पेक्टर झाले होते. 1998 मध्ये डीएसपी झाले. 2012 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती. चंद्रा यांचा एक मुलगा मुंबईत बँक अधिकारी आहे, तर दुसरा मुलगा पटना उच्च न्यायालयात वकील आहे.

Leave a Comment