पाकिस्तान सरकार राजधानीत बांधणार पहिले वहिले हिंदू मंदिर

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी 10 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे. भगवान कृष्णाच्या या मंदिराला इस्लामाबादच्या एच-9 भागात 20 हजार वर्गफूट क्षेत्रात उभारले जाणार आहे. पाकिस्तानचे मानवाधिकारांचे संसदीय सचिव लाल चंद्र माल्ही यांनी या मंदिराची पायाभरणी केली.

यावेळी माल्ही म्हणाले की, वर्ष 1947 च्या आधी इस्लामाबाद आणि त्याला लागून असलेल्या भागांमध्ये अनेक हिंदू मंदिरे होती. इस्लामाबादमध्ये अल्पसंख्याकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील कमी जागा असल्याचे ते म्हणाले.

धार्मिक प्रकरणाचे मंत्री पीर नुरूल हक कादरी यांनी सांगितले की, सरकार या मंदिराच्या निर्मितीसाठी 10 कोटी रुपये खर्च करेल. मंदिरासाठी विशेष निधी देण्याचे आवाहन पंतप्रधान इम्रान खान यांना करण्यात आले आहे. इस्लामाबाद हिंदू पंचायतने या मंदिराचे नाव श्रीकृष्ण मंदिर ठेवले आहे. या मंदिरासाठी 2017 मध्ये जमीन देण्यात आली होती. या मंदिर परिसरात अंत्य संस्कार स्थळ देखील असेल. याशिवाय अन्य हिंदू मान्यतांसाठी देखील जागा दिली जाईल.

Leave a Comment