अंतराळात खाजगी भागीदारीद्वारे आत्मनिर्भर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार देश – मोदी

केंद्र सरकारने आज अंतराळ उपक्रमात खाजगी क्षेत्राच्या भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी दुरगामी सुधारणांना मंजूरी दिली आहे. अंतराळ क्षेत्र आता खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, हा निर्णय देशाला आत्मनिर्भर बनवणे आणि तांत्रिकदृष्ट्या पुढे नेण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

भारत अंतराळ क्षेत्रात प्रगतीशील देशांपैकी एक आहे. या सुधारणांमुळे क्षेत्राला नवीन उर्जा व गतिशीलता मिळेल. ज्यामुळे अंतराळ उपक्रमांना पुढील टप्प्यात वेगाने पुढे जाण्यास मदत होईल. खाजगी भागीदारीमुळे भारतीय उद्योगजगत अंतराळ अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपुर्ण भूमिका बजावेल. यासोबतच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि भारत एक जागतिक तंत्रज्ञान उर्जा क्षेत्र बनत आहे. अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांना देखील संधी निर्माण होतील.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थी आणि खाजगी कंपन्यांसाठी भारताचे अंतराळ क्षेत्र उघडले जाईल. खाजगी कंपन्यांसाठी इंडियन नॅशनल स्पेस प्रोमोशन अँड अथॉरायझेशनची (इन-स्पेस) स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था अंतराळ उपक्रमांमध्ये खाजगी उद्योगांना मार्गदर्शन करेल व प्रोत्साहन देईल. सिंह यांनी सांगितले की, इस्त्रो मूळ संस्था आहे. मात्र ही नवीन सुविधा गॅप भरण्यास आणि मागणी पुर्ण करेल.

त्यांनी सांगितले की, ही काही नवीन संस्था नाही. मात्र याची भूमिका आता इस्त्रोमध्ये वाढवण्यात आली आहे. अंतराळ क्षेत्रात हे एक नवीन वळण आहे.

 

Leave a Comment