अमेरिका-चीनला मागे टाकत जपानने तयार केला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर

जपानने अमेरिका आणि चीनला मागे टाकत जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर तयार केला आहे. या कॉम्प्युटरचे नाव फुगाकू (Fugaku) आहे. यात 48 कोर ए64एफएक्स चीप लावण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हा जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर आहे, ज्यात एआरएम प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.

फुगाकूने 415.5 पेटाफ्लॉप्सचा परिणाम दिला आहे. जो आयबीएमच्या समिट सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत 2.8 पट अधिक आहे. आयबीएम समिट जगातील दुसरा सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर आहे. फुगाकूने अनेक चाचण्यांमध्ये टॉप रँकिंग मिळवली आहे. ज्यात ग्राफ 500, एचपीएल-एआय आणि एचपीसीजी चाचण्यांचा समावेश आहे.

सर्वसाधारणपणे सुपर कॉम्प्युटरमध्ये अमेरिका आणि चीनचा दबदबा असतो. मात्र यंदा जपानने बाजी मारली आहे. मागील 9 वर्षात फुगाकू जपानचा पहिला सुपर कॉम्प्युटर आहे, ज्याने टॉप-500 मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत 226 चायनीज सुपर कॉम्प्युटर, 114 अमेरिकन आणि 30 जपानचे सुपर कॉम्प्युटर्स आहेत. टॉप-500 हे एक रिसर्च ऑर्गनाइजेशन आहे. जे प्रत्येक सहा महिन्यांनी सुपर कॉम्प्युटर्सची रँकिंग जारी करत असते. फुगाकूचा वापर यावर्षी पासून केला जाईल. कोरोना संदर्भातील रिसर्चसाठी देखील याचा वापर केल जाईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment