एका पत्रावरून हिंदुजा ब्रदर्समध्ये 83 हजार कोटी मालमत्तेचा वाद, जाणून घ्या पुर्ण प्रकरण

उद्योगपती हिंदुजा ब्रदर्समध्ये एका पत्रावरून वाद निर्माण झाला आहे. एका पत्रामुळे हिंदुजा कुटुंबात 11.2 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 83 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून वाद निर्माण झाला आहे. 2014 च्या या पत्रानुसार एका भावाकडील संपत्तीवर सर्व भावांचा अधिकार आहे. मात्र आता 84 वर्षीय श्रीचंद हिंदुजा आणि त्यांची मुलगा विनू यांचे म्हणणे आहे की पत्र निरर्थक असल्याचे घोषित करावे.

लंडनच्या एका न्यायालयात सुनावणी दरम्यान हा प्रकार समोर आला. यावेळी न्यायाधीश म्हणाले की, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक या तीन भावांनी पत्राचा वापर हिंदुजा बँकेवर नियंत्रण मिळविण्यासाठी केला. मात्र त्यावर श्रीचंद हिंदुजा यांचा पुर्ण अधिकार आहे. श्रीचंद आणि विनू यांचे म्हणणे आहे की या पत्राचा वापर कायदेशीर म्हणून करू नये.

इतर तीन भावांनी म्हटले की, हे प्रकरण पुढे सुनावणीसाठी गेल्यास हे कुटुंबाच्या सिद्धातांच्या विरोधात असेल. सर्वकाही सर्व भावांचे आहे व कोणत्याही एकाच अधिकार नाही, असे अनेक दशकांपासून सुरू आहे. तिन्ही भावांचा दावा मंजूर झाल्यास श्रीचंद यांच्या नावावरील संपत्ती त्यांची मुलगी व इतर कुटुंबाकडे जाईल. यात हिंदुजा बँकेच्या शेअर होल्डिंगचा देखील समावेश आहे.

हिंदुजा कुटुंब हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. मागील 100 वर्षांपासून त्यांचा व्यवसाय सुरू आहे. फायनान्स, मीडिया आणि आरोग्य सेवेत त्यांचे 40 पेक्षा अधिक देशात व्यवसाय आहेत. त्यांची एकूण संपत्ती 83 हजार कोटी रुपये आहे.

 

Leave a Comment